केनिया : एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याची माहिती, केनजेन वीज कंपनीने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रमुख गिटारु संयंत्राच्या ट्रान्सफार्मरवर जंगली माकड पडलं. त्यामुळे ही वीज गेली, केनियाची राजधानी नैरुबीपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गिटारू संयत्रात ही घटना घडली. गिटारु हे केनियामधील सर्वात मोठं संयंत्र आहे.


या प्रकारामुळे ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण देशातील वीज तब्बल ४ तास गायब झाली होती. १८० मेगावॅट क्षमतेने होणारा वीजपुरवठा थांबला आणि संपूर्ण केनियामध्ये अंधार झाला.


या घटनेनंतर माकडाचा जीव वाचवण्यात आला. केनिया वन्यजीव विभागाकडून या माकडावर उपचार सुरू आहेत.