नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई सरकारनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला जोरदार दणका दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिमची तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती यूएई सरकारनं जप्त केली आहे. दाऊदने यूएईमधल्या अनेक कंपन्यांत शेअर्स गुंतवले आहेत. तसंच तिथे त्याची बेनामी संपत्तीही आहे.


गेल्या वर्षीच यूएई सरकारनं भारत सरकारला एक यादी सोपवली होती. त्यात दाऊदच्या यूएईमधल्या संपत्तीची चौकशी आणि ती जप्त करण्याचं काम सुरु करण्यात आल्याचं म्हटलं होतं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या यूएई दौऱ्यामध्ये, दाऊदच्या संपत्तीची माहिती यूएई सरकारला सोपवली होती. त्यानंत यूएई सरकारनं दाऊद विरोधात हे कारवाईचं पाऊल उचललं. 


दुबईशिवाय दाऊदच्या मोरोक्को, स्पेन, सिंगापूर, थायलंड, सायप्रस, तुर्कस्तान, भारत, पाकिस्तान आणि लंडनमध्येही गुंतवणूक आहेत.