म्यानमार : म्यानमारच्या बौद्ध समुदायात मुस्लिमांविषयी काही पूर्वग्रह नक्कीच असू शकतात, पण हाच पूर्वग्रह 'नोबल पुरस्कार' प्राप्त आंग सान सू की यांच्याही मनात आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी एक घटना उघडकीस आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, एका मुलाखतीनंतर त्यांना 'कुणी मला अगोदर का नाही सांगितलं की माझा इंटरव्ह्यू एक मुस्लिम घेणार आहे' असं रागारागाने म्हणताना पाहिलं गेलं. २०१३ साली बीबीसीच्या पत्रकार मिशाल हुसैन यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. 


मूळची पाकिस्तान असलेल्या एका ब्रिटिश पत्रकार असलेली मिशाल रोहिंग्या मुस्लिमांविरुद्ध होणाऱ्या हल्ल्यांबाबत प्रश्न विचारत होती. 


हा दावा 'द इंडिपेन्डन्ट'चे पत्रकार पीटर पॉपम यांनी आपल्या 'द लेडी अॅन्ड द जनरल्स : आंग सान सू की अॅन्ड बर्माज स्ट्रगल फॉर फ्रिडम'मध्ये केलाय. 


सू की यांनी 'ऑफ एअर' ही गोष्ट म्हटली होती, त्यामुळे त्याचा कोणताही पुरावा नाही. बीबीसीनं मात्र या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. 


उल्लेखनीय म्हणजे, रोहिंग्या आणि बौद्ध समुदायात झालेल्या संघर्षावर सू की यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. यावर अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. शिवाय नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षातर्फे एकही मुस्लिम उमेदवार उभा करण्यात आला नव्हता. यावरूनही त्या टीकेचं केंद्रस्थान बनल्या होत्या.