सँटिगो : चीलीची राजधानी असलेल्या सँटिआगोमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यासाठी सिंहाच्या पिंज-यात उडी मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रसंगामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी घटनास्थळी असलेल्या सुरक्षारक्षकाने सिंहावर गोळी चालवत जखमी तरूणाला वाचवले. 


तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाला वाचवणं जास्त महत्त्वाचं होतं असं सांगत सिंहाना मारण्याच्या कृतीचं प्राणीसंग्रहालयाने समर्थन केलंय. हे सर्व नियमांतर्गत केल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.