इस्लामाबाद : जवळपास 32 वर्षांपूर्वी जिओग्राफिकवरच्या एका फोटोतून 'अफगाण गर्ल' नावानं हिरव्या डोळ्यांची एक चेहरा खूपच चर्चेत आला होता... याच चेहऱ्याला आज पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आलीय.


अफगाण युद्धाची मोनालिसा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या युद्धातील 'मोनलिसा' म्हणून हिरव्या रंगांच्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्यावर अनेक भावभावना असलेल्या मुलीचा चेहार जिओग्राफिकनं प्रसिद्ध केलेल्या एका फोटोतून चर्चेत आला होता.... हा चेहरा होता शरबत बीबीचा...


का झाली अटक...


पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननं दिलेल्या बातमीनुसार, पाकच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं शरबतला पेशावरमधून ताब्यात घेतलंय. नॅशनल आयडेन्टिटी कार्ड बनवण्याच्या कम्प्युटराइज्ड प्रोसेसमध्ये फसवाफसवीच्या प्रकरणी शरबतला अटक करण्यात आलीय. शरबतकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अशा दोन्ही देशांची सिटीझनशीप आहे.  


शरबतच्या दाव्यानुसार, तिला दोन मुलं आहेत. परंतु, चौकशीत तिला दोन मुली आणि एक मुलगा असल्याचं समोर आलंय.


2002 साली 'जिओग्राफिक'वर

32 वर्षांनंतर...


1984 मध्ये पेशावरच्या एका रिफ्युजी कॅम्पमधून नॅशनल जिओग्राफिकचा फोटोग्राफर स्टीव मॅककरी यानं शरबतचा हा फोटो घेतलेला होता. जून 1985 मध्ये मॅगझीनच्या कव्हर पेजवर हाच फोटो झळकला होता.... शरबत तेव्हा केवळ 12 वर्षांची होती. त्यानंतर मॅगझीननं याच चेहऱ्यावर एक डॉक्युमेंटरीही बनवली होती.


त्यानंतर, शरबत कुठेतरी गायब झाली. 2002 साली तिला मॅगझीनच्या लोकांनी पुन्हा शोधून काढलं. तिच्या कुटुंबीयांची फोटोग्राफर स्टीवनं भेट घेतली... आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी स्टीवनं तिचा आणखी एक फोटो घेतला.


कुठे दडलीय खरी मेख?


अफगाण रिफ्युजींची गाथा कथन करण्यासाठी हा फोटो घेण्यात आला होता. यावेळीही, शरबतच्या हिरव्या डोळ्यांमध्ये एक अनामिक भीती दिसून आली होती. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानात अफगाण युद्धाचे रिफ्युजी राहत आहेत. यातील, अर्ध्याहून जास्त लोकांकडे ना अफगाणिस्तानचं नागरिकत्व आहे ना पाकिस्तानचं...