नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा
न्यू यॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे.
अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पाकिस्तानला भारतासोबत शांतता पाहिजे, तसे पाऊल पाकिस्तानने भारताच्या दिशेने टाकले आहेत. पण भारताला शांतता नको, त्यांनी याचे समर्थन केले नाही, अशा चोराच्या उलट्या बोंबा शरीफ यांनी यूएनमध्ये आज मारल्या.
शांतता ही दोन्ही देशांच्या प्रयत्नाने येणार पण काश्मीर मुद्दा सोडविल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही.
शरीफ म्हणाले, भारताने काश्मिरवर जबरदस्ती कब्जा केला आहे. बुरहान वानी सारख्या युवा नेत्याच्या हत्येनंतर काश्मीरमधील परिस्थिती बिघडली आहे. भारताचे लष्कर काश्मिरच्या जनतेवर अत्याचार करीत आहे. सुमारे १०० जणांना गेल्या दोन महिन्यात ठार मारले आहेत, असाही कांगावा त्यांनी यावेळी केला.