लंडन : उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अवस्थेचा परिणाम असू शकतो असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी कंलंय.


उरी हल्ल्याचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही त्यामुळे भारत पुराव्याशिवाय बोलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानतर पाकिस्तानला निघालेले शरीफ काहीवेळ लंडनमध्ये थांबले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारतावर हे आरोप केलेत.