काठमांडू : नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला (७९) यांचे आज सकाळी निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोईराला यांना गळ्याचा कर्करोग झाला होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाने ग्रासले होते. अखेर आज सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. नेपाळची राजधानी काठमांडूपासून जवळच असलेल्या महाराजगुंज येथे ते राहत होते. 


त्यांच्यावर अमेरिकेत गळ्याच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नेपाळमध्ये आणण्यात होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये नेपाळने नवे संविधान स्वीकारले होते. त्यामध्ये कोईराला यांचे मोठे योगदान हाते.


कोईराला यांची १० फेब्रुवारी २०१४ मध्ये नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. कोईराला यांचे जन्म भारतातील बनारस येथे झाला होता. त्यांनी १९५४ राजकारणात प्रवेश केला. १९७३ मध्ये विमान अपहरण प्रकरणात त्यांनी तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. 


कोईराला यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.