अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.
मुंबई: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता. चार शिपिंग कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन 1993 ते 1997 या काळात डायरेक्टर होते, असा दावा करण्यात आला होता.
अमिताभ बच्चन यांनी हे आरोप फेटाळले होते. मला या कंपन्यांबद्दल काहीच माहिती नाही, तसंच आपलं नाव यामध्ये गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
पण इंडियन एक्स्प्रेस आणि पनामा पेपरनी बिग बींचा हा दावा फेटाळला आहे. एवढच नाही तर त्यांच्यावर आणखी आरोपही केले आहेत. या चारपैकी दोन कंपन्यांच्या बोर्ड मिटींगमध्ये बच्चन टेलिफोनवरून सहभागी झाले होते, असा दावा इंडियन एक्स्प्रेसनं केला आहे.
याबद्दलची कागदपत्रही इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केली आहेत. ट्रॅम्प शिपिंग कंपनी आणि सी बल्क शिपींग कंपनी यांच्या मिटींग 12 डिसेंबर 1994 ला झाल्याचा दावाही पेपरनं केला आहे.