मुंबई : भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान नवीन नवीन फंडे वापरत आहे. यासाठी त्यांनी भारतीय मोबाईल कंपन्यांचा आसरा घेतलाय. तुम्हाला लकी ड्रा लागल्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. यातून त्यांचा मोबाईल डाटा हॅक केला जात आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.


पाकिस्तानी नंबर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपासून मोबाईलवर पाकिस्तानी नंबर +92-3004989471 वरुन आलेला कॉल घेऊ नका. तुम्हाला लकी ड्राच्या नावाखाली जाळ्यात ओढले जाईल. दरम्यान, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर तुमचा फोन कट होईल. 


५ अंकाचा एक नंबर घातक


तुम्ही पुन्हा कॉल केला तर तुम्हाला ५ अंकाचा एक नंबर दिला जाईल. ते केवळ चेक करण्याच्या नावाखाली तुमचा मोबाईल डाटा हॅक करण्यासाठी. तुम्ही त्याला बळी पडू नका. जर तुम्ही पुन्हा त्याच नंबरला कॉल केला तर तुमचा मोबाईल अचानक बंद होईल आणि मोबाईल डाटा हॅक होईल. याबाबत सतर्कता बाळगा. ट्रुकॉलर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोठून फोन आलाय ते समजेल. पाकिस्तानातून जर नंबर आला तर तुम्ही तो कधीही उचलू नका किंवा परत करु नका.