नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश
तालिबानी हल्ल्यातून वाचलेली आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश झाली आहे.
लंडन : तालिबानी हल्ल्यातून वाचलेली आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश झाली आहे.
चार वर्षांत मलालाची कहाणी सांगणाऱ्या 'आय एम मलाला' या पुस्तकाच्या लाखो प्रती संपल्या आहेत. त्यातून यूसूफझई कुटुंबाने या पुस्तकाच्या विक्रीतून तीस लाख डॉलर्सचे उत्पन्न कमावले आहे.
जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध 'आय एम मलाला' या पुस्ताकाच्या १८ लाख प्रती विकल्या गेल्यात. मलालाच्या आमोघ वकृत्वावरही सारे जग फिदा आहे. सध्या मलालाच्या एका भाषणासाठी १ लाख ५२ हजार डॉलर्सचे मानधन द्यावे लागले. हे सगळे उत्पन्न युसूफझई कुटुंबाने स्थापन केलेल्या 'सर्लाझई लिमिटेड' या कंपनीच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येते.
या कंपनीच्या मार्फत मलाला आणि तिचे कुटुंबिय एकूण उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरतात. कंपनीनं जाहीर केलेल्या माहितीनुसार मलालाचे व़डील झीयाउद्दीन यूसूफझई आणि तिची आई तूर पेकाई यांची एकूण संपत्ती १८ लाख ७० हजार पाऊंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात ६५ टक्के वाढ झाली.