सेऊल :  अमेरिकेने कोरियाच्या द्विपकल्पावर नौदलाच्या वॉर शीपची तैनाती केल्याने उत्तर कोरियाने याचा मोठा विरोध केला आहे. तसेच अमेरिकेला युद्धाची खुली धमकी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएनएनुसार उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, यावरून सिद्ध होते की उत्तर कोरियावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने गडबडीत पाऊल उचलले आहे. ही एक गंभीर बाब झाली आहे. अमेरिकेला जसे युद्ध हवे तसे युद्ध उत्तर कोरिया लढण्यास तयार आहे. 


अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयावर मिसाईल हल्लाचे आदेश दिले होते. त्या शिवाय प्योंगयांगवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करण्यास सांगितले आहे. 


तसेच ट्रम्प यांनी या पूर्वी इशारा दिला की उत्तर कोरियाचा एकमेव मोठा सहकारी चीन आपल्या शेजारी देशाच्या अणूवस्त्रांवर नियंत्रण मिळवण्यात निष्फळ ठरला तर अमेरिका एकतर्फी कारवाई करू शकतो.