मुंबई : अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय - अमेरिकन उद्योगपती आणि यूएस काँग्रेसमधील भारत-अमेरिका सल्लागार परिषदेचे अध्यक्ष शलभ कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवादाला आळा घालण्यासाठी ट्रम्प यांच्या काळात अमेरिकाही भारताच्या सोबत असेल... दहशतवादाविरुद्ध कारवाई केल्याबद्दल आता अमेरिका भारतावर टीका करू शकणार नाही कारण ट्रम्प आता राष्ट्राध्यक्ष बनलेत.


आता दहशतवादाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारला कोणतीही भीती नसेल... तसंच आता पूर्व असो वा पश्चिम... दहशतावादाला आता थारा मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.