युएनएससीमध्ये पाकिस्तानच्या पत्रकाराला प्रश्न विचारतांना रोखलं
एलओसीमध्ये भारतीय सेनेने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जणाव वाढला आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तान आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलत आहे पण त्यांना यावर कोणतंही समर्थन मिळत नाही आहे.
न्यूयॉर्क : एलओसीमध्ये भारतीय सेनेने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जणाव वाढला आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तान आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलत आहे पण त्यांना यावर कोणतंही समर्थन मिळत नाही आहे.
बातमीच्या शेवटी पाहा व्हिडिओ
यूएनची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत प्रश्न विचारला यावर अध्यक्षांनी पत्रकाराला हा प्रश्न विचारतांना रोखलं.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या अध्यक्षांनी पाकिस्तानच्या पत्रकाराला प्रश्न विचारतांना रोखलं. त्यांनी म्हटलं की, यूएनएसएसी या मुद्द्यांवर चर्चा नाही करत.