७००० कार आणि सोन्याच्या विमानाचा मालक आहे हा व्यक्ती
ब्रनेईचे सुलतान हसनल यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जातं. तेलांच्या विहिरी हे या मागचं कारण आहे. १९८० मध्ये सुलतान यांना पहिल्यांदा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा खिताब मिळाला होता. त्यानंतर १९९० मध्ये बिल गेट्स यांनी हा किताब मिळवला. सुलतान यांची संपत्ती एकूण १.२४ लाख कोटी एवढी आहे.
ब्रनेई : ब्रनेईचे सुलतान हसनल यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जातं. तेलांच्या विहिरी हे या मागचं कारण आहे. १९८० मध्ये सुलतान यांना पहिल्यांदा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा खिताब मिळाला होता. त्यानंतर १९९० मध्ये बिल गेट्स यांनी हा किताब मिळवला. सुलतान यांची संपत्ती एकूण १.२४ लाख कोटी एवढी आहे.
गाड्यांचे शौकीन : हसनल यांना गाड्यांचं कलेक्शन करायला खूप आवडतं. फरारी वॅगनाजेशंस, एस्टन मार्टीन आणि बेंटलेसह अनेक महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत.
७००० कार : हसनल यांच्या गॅरेजमध्ये एकूण ७००० गाड्या आहेत. यामध्ये ६०० मर्सिडीज, ३०० फरारी आणि एक सोन्याचं विमान आहे. यांच्या ३ कारची किंमत जवळपास ५ बिलियन डॉलर आहे. त्यांच्याकडे एक गोल्ड प्लेटेड कार पण आहे. १७८८ खोल्यांची महल आणि छतवर लोन्याचे प्लेट्स आहेत.
हसनल यांचं विमान महलापेक्षा कमी नाही. त्यांच्या विमानामध्ये लिविंग रूम, बेड रूम आणि खूप सोनं देखील आहे.