नवी दिल्ली : उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षा देण्याचं ठरवलं आहे. भारताने कडक भूमिका स्विकारल्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या एअरफोर्सने लाहोरमध्ये 'हाई-मार्क' सराव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या उत्तर भागात एअरस्पेसजवळ पाकिस्तान एअरफोर्सच्या फायटरने युद्धअभ्यास केला. पाकिस्तानी एअरफोर्सने या अफवेच्या बळावर हा सराव केला आहे की भारताचं लष्कर लाईन ऑफ कंट्रोलच्या सीमा ओलांडून हल्ला करु शकतो.


पाकिस्तान एअरफोर्सचा हा सराव तेव्हा समोर आला जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव खूप वाढला आहे. दोन्ही देश हे अणूबॉम्ब संपन्न आहेत. उरीमध्ये हल्ल्यानंतर अशी अफवा पसरवली जात होती की भारताचं लष्कर हे सीमा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला करु शकतो. त्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.