नवी दिल्ली : एलओसीजवळ पाकिस्तान आर्मीचे चीफ राहिल शरीफ यांनी दौरा करुन सुरक्षेच्या आढावा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहिल शरीफ यांनी पाकिस्तान सेनेच्या एका यूनिटसोबत एलओसीच्या हाजी पीर सेक्टरचा दौरा केला आहे. एलओसीवर काही हालचाली होऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. यानंतर भारतीस सेना देखील अलर्ट झाली आहे.


भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. लष्कराकडून सीमेवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.