नवी दिल्ली : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आणखीन एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, राजधानी इस्लामाबादमध्ये एका भारतीयाला अपूर्ण कागदपत्रांशिवाय प्रवास करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलीय. या भारतीय नागरिकावर परदेश कायद्याच्या अॅक्ट १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मुंबईचे रहिवासी असलेले शेक नबी असं यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. इस्लामाबादच्या एफ-८ या भागातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. 


उल्लेखनीय म्हणजे, कुलभूषण जाधव यांच्या अटकेचं प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात पोहचलंय. आंतरराष्ट्रीय कोर्टानं आपल्या अंतिम निर्णयात जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिलीय. त्यामुळे भारत - पाकचे संबंध आणखीनच बिघडलेत. त्यातच आणखीन एका भारतीयला झालेली अटक निश्चितच चिंतेच वातावरण तयार करणारी ठरू शकते.