इस्लमाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान 21 ऑक्टोबरपासून भारतीय चॅनेल्स तसेच रेडिओ कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारपासून बंदीचा हा नियम लागू करण्यात येणार आहे. या बंदीनंतर जर कोणी भारतीय वाहिन्या आणि रेडिओ सुरु ठेवल्या तर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यांचं लायसन्सचं रद्द केलं जाणार आहे. 


PEMRA अर्थातच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने भारतीय वाहिन्यांवर 21 ऑक्टोबरपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता भारतालील कुठलेही कार्यक्रम पाकिस्तानमध्ये प्रसारित होणार नाही.