इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दिसणाऱ्या सगळ्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण म्हणजेच पेमरानं घेतला आहे. 15 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याची नोटिसही देण्यात आली आहे.


हे नियम न पाळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असंही पेमराच्या या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. उरीमध्ये हल्ला झाल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. यानंतर भारतीय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे काही कलाकार भारत सोडून पाकिस्तानला परत गेलेत. या सगळ्या प्रकारानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्ताननं हा निर्णय घेतला आहे.