इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत. पीटीव्हीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इमरान खानविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 सप्टेंबर 2014 ला इमरान खानच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पीटीव्हीवर हल्ला केला होता. जवळपास 400 कार्यकर्ते पीटीव्हीच्या ऑफिसमध्ये घुसले होते.


पाकिस्तानच्या न्यायालयानं दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 2 नोव्हेंबरला इस्लामाबादला वेढा घालण्याच्या तयारीमध्ये इमरान खानचा पक्ष होता, त्याआधीच हा निकाल आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण आणखी खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमरान खानच्या पक्षानं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हकालपट्टीबाबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे.