इस्लामाबाद :  बलूच नेता ब्रह्मदाग बुगती याला शरण देऊन नये, अशी धमकी पाकिस्तानने आज भारतला दिली आहे. बुगतीला शरण देऊन  दहशतवादाचा अधिकृत प्रायोजक बनत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ट्विट करून म्हटले की भारताने बुगतीला शरण देणे म्हणजे दहशतवाद्याला आसरा देण्यासारखे होणार आहे. अशापद्धतीने भारत दहशतवादाचा अधिकृत प्रयोजक बनत आहे. 


बुगती याने काल अर्ज करून भारताकडे शरण मागितले होते. भारताचे गृहमंत्रालय याचे अध्ययन करत आहे. 


स्वित्झर्लंडमध्ये राहणारा बुगतीने मंगळवारी जिनेवातील भारतीय दुतावासाशी संपर्क केला आणि शरण मागितली होती. त्यावर दिल्लीने त्यावर सकारात्मक उत्तराचे आश्वासन दिले आहे. 


बुगती बलूच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि संस्थापक आहे. हे बलूच राष्ट्रवादी नेता नवाब अकबर बुगती यांचे सुपूत्र आहे. त्यांची २००६ मध्ये पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती.