नवी दिल्ली : पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर रोख लावल्यानंतर आणि त्यांना काऊंसिलर देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा रिव्यू पिटीशन दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जाधव यांना सुनावलेली फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. पाकिस्तानने जाधवला गुप्तहेर असल्याचं सांगून फाशी सुनावली होती. पण नेव्हीमधून निवृत्त होऊन त्यांना बरेच दिवस झाले आहेत आणि सध्या ते व्यापार करत होते.


पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलने सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार जाधव प्रकरणावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुन्हा याचिका दाखल केल्याचं म्हटलं आहे.
 
विशेष म्हणजे रिव्यू पिटीशन त्यांनीच दाखल केली आहे ज्यांच्यावर टीका होत आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, कुरैशी हेच पाकिस्तानकडून आपली बाजू मांडतील.