पाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण
उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.
पाकिस्तान सुषमा स्वाराज यांच्या यूएनमधील भाषणानंतर अजूनच वैतागलेला दिसत आहे. सुषमा स्वराज यांनी आक्रमकपणे भारताची बाजू मांडली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चौख उत्तर दिलं. भारता सुरु केलेल्या पाकिस्तानच्या कोंडीनंतर पाकिस्तान वेडा झाला आहे. पाक सरकार अंतर्गत वाद मिटवण्यात अपयशी ठरला आहे. पाकिस्तानात सरकार विरोधात लोकं रस्त्यावर उतरत आहेत. पाकिस्तान भारतावर खोटे आरोप करत आहेत. पाकिस्तानातील नेते टीव्ही चॅनेलवर बसून भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत.