न्यूयॉर्क : पाकिस्तानंन पुन्हा एकदा काश्मीरचा राग न्यूयॉर्कमध्ये आळवण्याचा प्रयत्न केला. पण नवाज शरीफ यांचे प्रयत्न भारताने पुरते हाणून पाडले. भारताच्या फर्स्ट सेक्रेटरींनी शरीफ यांच्या भाषणाची चिरफाड करून प्रत्येक मुद्दा खोडून काढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच पाकिस्तान हा दहशतवादी राष्ट्र असल्याची टीका भारताने केलीये. ज्यांना संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेय ते पाकिस्तानच्या रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरतायत, असे भारताने म्हटलेय. 


संयुक्त राष्ट्र संघांच्या मंचावरून गेली अनेक वर्ष आपलं काश्मीरचं रडगाणं पाकिस्ताननं पुन्हा एकदा गायलं. काश्मीरमध्ये भारतानं आतापर्यंत केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांचा पाढा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. 


पाकच्या पंतप्रधानांनी लावलेल्या धादांत खोट्या आरोपांवर भारतानंही सडेतोड उत्तर दिलंय. संयुक्त राष्ट्रात भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी इनाम गंभीर यांनी नवाज शरीफ यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. शिवाय पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरून दहशतवादाचं पोकळ समर्थन करत असल्याची टीका ही केली


उरी हल्ल्याविषयी चकार शब्द न काढणाऱ्या नवाज शरीफ यांच्या भाषणाच्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात किती लोक होते हे या छायाचित्रावरून स्पष्ट होतंय. 


काश्मीरमध्ये गेली सहा दशकं सुरू असलेल्या छुप्या युद्धाचं समर्थन आता करणं आता पाकिस्तान कठीण होत चाललंय. भारतानं पाकिस्तानला एकटं पाडण्याची रणनीती जाहीर केलीय. त्यादृष्टीनं शरीफ यांना दिलेलं उत्तर म्हणजे पुढच्या सोमवारी सुषमा स्वराज यांच्या भाषणात काय दडलं असेल याची छोटीशी चुणूक बघायला मिळलीये.