लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरच्या एका न्यायालयानं कोहिनूर हिऱ्याला ब्रिटनहून पाकिस्तानला आणण्याची विनंती करणारी एक याचिका ग्राह्य धरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१०५ कॅरेटचं जगातील हे सर्वात मौल्यवान रत्न अनेकदा वादात राहिलंय.  अखंड भारतावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं तेव्हा १८४९ साली ब्रिटननं हा हिरा पंजाबमधून मिळवला होता.   


काय म्हटलंय याचिकेत...


लाहोरचे ७७ वर्षीय इकबाल जाफरी यांनी ही याचिका दाखल केलीय. या अगोदर लाहोर हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली होती. परंतु, आता एका न्यायाधीशांनी ही याचिका स्वीकार केलीय. 


दलीप सिंह यांना जेव्हा पदावरून हटवण्यात आलं तेव्हा ते पंजाबचे राजा होते. ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्याकडून हा हिरा घेतला होता. परंतु, ब्रिटननं कोहिनूर हिरा त्यांच्याकडून जबरदस्तीनं 'हिसकावून' घेण्यात आला होता. हा हिरा ब्रिटनला भेट म्हणून मिळालेला नव्हतं. जे चुकीचं आहे त्याला चुकीच सिद्ध करायलाच हवं, असं या याचिकेत म्हटलं गेलंय.   


... म्हणून कोहिनूरवर पाकचा हक्क


या हिऱ्याची चोरी लाहोरमधून करण्यात आली होती. त्यामुळे, या हिऱ्यावर भारताहून अधिक पाकिस्तानचा हक्का आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. ही याचिका दाखल करण्याआधी इकबाल यांनी ब्रिटनची रानी आणि पाकिस्तानला तब्बल ७८६ चिठ्ठ्या लिहिल्यात. 


पाक इतिहास तज्ज्ञांना काय वाटतं... 


जामिया मिलिया इस्लामियामध्ये इतिहासाचे प्रोफेसर रिझवान कैसर यांनी 'बीबीसी'शी बोलताना पाकचा दावा फेटाळून टावलाय. 


रिझवान यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान १९४७ नंतर अस्तित्वात आलं... त्याअगोदर जे काही होतं ते सगळं हिंदुस्तानाचं आहे. त्यामुळे, कोहिनूरचंही खरं नातं हिंदुस्तानशीच आहे.


भारतातील तज्ज्ञांनी मात्र, पहिल्यांदा हा हिरा परत मिळवावा, त्यानंतर तो पाकिस्तानकडे राहील की भारताकडे यावर चर्चा होऊ शकते, असं म्हटलंय.