PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे. आमचा काश्मीर सोडा, अशा पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर तणावासाठी गोळीबार करण्यात येत आहे.
मुजफ्फराबादमध्ये झालेलं हे आंदोलन, पोलिसांनी चिरडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याकरिता मोठ्या संख्येने जमलेल्या निदर्शकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीमार केला गेला.
पोलिसांच्या लाठीमाराला न घाबरता आंदोलकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा देत, पाकिस्तानी सैन्य आपल्या भागातून तात्काळ हटवण्याची मागणी केली.