इस्लामाबाद :  एका भारतीय सैनिकाला एलओसीवरून पाकिस्तानने ताब्यात घेण्यात आल्याचा दावा, पाकिस्तान मीडियाने केला आहे. मात्र हा पाकिस्तानचा दावा किती खरा आहे, किती पोकळ आहे हे इंडियन आर्मीने स्पष्टीकरण दिल्यावर समजणार आहे, तरी देखील पाकिस्तानच्या स्थानिक दैनिकाच्या माहितीत तफावत दिसून येत आहे.


काय आहे पाकिस्तानी दैनिक डॉनचा दावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वेबसाईटने छापलेल्या बातमीनुसार, २२ वर्षाचा भारतीय सैनिक चंदू बाबूलाल चव्हाणला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला आहे. या सैनिक महाराष्ट्राचा असल्याचाही दावा आहे. 


सैनिक सापडला तर मग फोटो दाखवा


मात्र बाबुलाल चव्हाण नावाचं कुणी त्यांना सापडलं असेल, तर त्याचा फोटो मात्र त्यांनी मीडियात दिलेला नाही, उलट बाबूलालला अज्ञात स्थळी नेल्याचं पाकिस्तानी लष्कराने स्थानिक मीडियाला सांगितलंय़.


पाकिस्तानचा दावा प्रथमदर्शनी पोकळ 


दुसरीकडे मात्र चंदू बाबूलाल चव्हाणच्या वडिलांचं नाव भाषण चव्हाण असल्याचं म्हटलंय. तसेच आम्ही भारताच्या ८ सैनिकांना मारल्याचा दावा ही पाकिस्तानचा आहे. त्यांचे मृतदेह घेण्यास इंडियन आर्मी येत नाहीय, कारण ते आमच्या गोळीबाराचा सामना करण्यास धजावत नसल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केला आहे.