पाकिस्तानी सेनेने केला बलुचिस्तानवर हल्ला
भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानच्या सेनेने बलूचिस्तानमधील शहरांवर हल्ले सुरु केल्याची माहिती येत आहे.
नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानच्या सेनेने बलूचिस्तानमधील शहरांवर हल्ले सुरु केल्याची माहिती येत आहे.
बलूच रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान ऑर्मीने बलूचिस्तानच्या छत्तर, शेरानी, होती आणि नसीराबाद येथील अनेक ठिकाणांवर हल्ले करत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरु केली आहे. या लष्करी हल्ल्यात अनेक नागरीक मारले गेल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
बलुचिस्तानमध्ये लोकं अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरुन पाकिस्तान विरोधात बोलत आहे. पाकिस्तानकडून छळ होत असल्याचा अनेक दिवसांपासून ते आरोप करत आहेत.