बीजिंग : चीनच्या वेनझाऊ शहरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा प्राण वाचल्याच्या घटनेने सर्वानांच आश्चर्यचकित केले. इतक्या मोठ्या दुर्घटनेत चिमुकलीचा जीव वाचण्याचे कारण ऐकून तेथील उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारत दुर्घनेनंतर 12 तासानंतरही वडिलांच्या गच्च मिठीत असल्याने त्या चिमुकलीचा जीव वाचला. 


झेजिंआंगच्या पूर्व प्रांतातील वेनझोऊमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. यात पाच जण बचावले. बचावलेल्यांमध्ये त्या तीन वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे. 


शोधकार्यादरम्यान वडिलांच्या मिठीत असलेली ही चिमुरडी जिवंत आढळली. आपल्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांनी तिला घट्ट मिठीत धरुन ठेवले होते. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला. मात्र वडिलांचा जीव वाचू शकला नाही. या दुर्घटनेत त्या चिमुकलीच्या आईचाही मृत्यू झाला.