मुंबई : अनेकदा जीवनात असे काही प्रसंग येतात ज्या कितीही प्रयत्न केले तरी विसरता येत नाही. असंच काही घडलं आहे एका प्रसिद्ध छायाचित्रकाराच्या बाबतीत. केविन पार्टर या फोटो जर्नलिस्टने मार्च १९९३ मध्ये साऊथ सुडानमध्ये जाऊन फोटोशूट केलं. पण ही दुख:दायक परिस्थिती पाहून या फोटोग्राफरने ३ महिन्यात आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केविनला या फोटोसाठी पुरस्कार देखील मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर केविनने ३ महिन्यातच आत्महत्या केली. हा फोटो एका कुपोषित मुलीचा आहे जी भुकबळीची शिकार ठरण्याच्या मार्गावर आहे आणि एक गिधाड या मुलीच्या मृत्यूची वाट पाहत आहे. केविनने २० मिनिटापर्यंत गिधाड उडून जाण्याची वाट पाहत होतो पण तो उडाला नाही आणि मग फोटोग्राफरने हा फोटो क्लिक केला.


केविनने फक्त एक फोटो नाही तर एक अतिशय भयंकर परिस्थिती देखील या फोटोमधून क्लिक केली आहे. पण या परिस्थितीमुळे त्यांना एवढा मानसिक त्रास झाला की या फोटोग्राफरने आत्महत्या केली.