टांझानिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेतील टांझानिया देशाच्या दौ-यावर आहेत. यावेळी मोदींचा आगळा आविष्कार पाहायला मिळाला. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन पोंब जोसेफ मागुफुली यांच्यासोबत मोदींनी ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला. 


भारत आणि टांझानिया यांच्यात 5 विविध करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. 21 व्या शतकातील वाटचालीत भारत हा टांझानियाचा विश्वासू सहकारी असेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.