वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहे. या दोऱ्यातील आजचा दिवस हा पंतप्रधान मोदींसाठी खास असणार आहे. कारण आज अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला मोदी संबोधित करणार आहेत. २००५ साली यांनीच मोदींना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा दिवस मोदींसाठी खास आहे कारण ज्या अमेरिकन काँग्रेसने मोदींना विरोध केला होता त्यांचेच आज मोदी पाहुणे असतील. पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाकडे अख्या जगाचं लक्ष असणार आहे. 


ज्या प्रकारे भारतात संसद आहे तसेच अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेस आहे जी देशाची संपूर्ण रणनिती ठरवातात. सगळे महत्त्वाचे निर्णय येथून केले जातात. 


अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभेचे स्पीकर पॉल रायन यांनी पंतप्रधान मोदी यांना 8 जूनला या संयुक्त सत्राला संबोधित करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारत आणि खास करुन पीएम मोदी यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. 


नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणारे पाचवे भारतीय पंतप्रधान असणार आहेत. याआधी १९८५ मध्ये राजीव गांधी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं होतं. १९९४ मध्ये नरसिम्हा राव, २००० मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि २००५ मध्ये मनमोहन सिंग यांना देखील ही संधी मिळाली होती. प्रथम १९४९ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केलं होतं.


अमेरिकेत आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना अमेरिकेतील दोन्ही मोठे पक्ष असलेले रिपब्ल्किन आणि डेमोक्रेट्सच्या दोन्ही प्रतिनिधींसमोर त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे.