वॉशिंग्टन : ५ देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन पोहोचल्यानंतर पीएम मोदीचं भव्य स्वागत 
केलं गेलं. पीएमने तेथे थिंट टँक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग घेतला. या कार्यक्रमात भारतातील अनेक सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत केली गेली. यानंतर पीएम मोदींनी कोलंबिया शटल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अंतराळ वीर कल्पना चावला सहित इतरांनाही श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी आज अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी स्पेस शटल कोलंबिया मेमोरियलमध्ये कल्पना चावलाच्या परिवाराची आणि नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची देखील भेट घेतली. त्यानंतर  भारतीयवशांची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिचे पिता यांची देखील भेट घेतली.


सुनीता विलियम्सने म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी वेळ दिला म्हणून आम्हाला देखील सन्मान झाल्यासारखं वाटतंय. त्यांनी शटल दुर्घटनेवर दुख: व्यक्त केलं आणि अंतराळ जगताशी असलेला भारताच्या सहभागाचा देखील उल्लेख केला. त्यांनी माझी मैत्रीण कल्पना चावला हिची देखील आठवण काढली.' मोदींनी सुनीता वडिलांशी गुजरातीमध्ये संभाषण केलं आणि त्यांना भारतात देण्याचं आमंत्रण दिलं.


सुनीताच्या वडिलांनी म्हटलं की, जर माझं तब्येत चांगली राहिली तर मी निश्चितच भारतात येईन. कल्पना चावलाचे पती जीन पियरे हॅरिसनने कल्पना चावलावर त्यांनी लिहिलेलं एका पुस्तकाचा सेट पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिली.