व्हिएतनाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाममध्ये दाखल झाले तेव्हा पंतप्रधानांचं शानदार स्वागत करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात मोदींची राजकीय नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील काही मुद्द्यांसह सुरक्षा, व्यापारावर चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि व्हिएतनामदरम्यान यावेळी 12 करारांवर स्वाक्षरी झाल्या. रक्षा, स्वास्थ आणि अंतराळ क्षेत्रासंबंधी करार झाला. व्हिएतनामचे पंतप्रधान झ्युआन फूक, अध्यक्ष ट्रँन दाई क्व्यांग आणि कम्युनिस्ट पार्टी जनरल सेक्रेटरी यांच्याशीही मोदी संवाद साधणार आहेत.


ओएनजीसीच्या व्हिएतनाममधील काही प्रकल्पांबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. 15 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान व्हिएतनामच्या दौ-यावर आहेत. दरम्यान, मोदी आज व्हीएतनामहून चीनला रवाना होतील. त्यानंतर चार आणि पाच तारखेला चीनच्या हाँगझाऊ शहरात जी ट्वेंटी देशांची वार्षिक परिषद होणार आहेत. त्यात पंतप्रधान सहभागी होती. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची अनेक देशांच्या प्रमुखांशी समोरासमोर चर्चाही होणार आहे. त्यात मोदी-ओबामा भेटीकडे प्रमुख्यानं लक्ष असेल.