हांगझोऊ : ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच थेरेसा मे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. चीनमधल्या हांगझोऊ शहरात जी-20 परिषदेनिमित्त ही द्विपक्षीय भेट झाली. UKच्या नव्या व्हिसा धोरणाचा अल्पकाळासाठी ब्रिटनमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय नोकरदारांना फटका बसत असल्याचं मोदींनी यावेळी निदर्शनास आणून दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच आगामी काळात संरक्षण सहकार्य अधिक वाढवण्यावरही मोदी आणि मे यांच्यात चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलं. मेक इन इंडिया मोहीमेमध्ये ब्रिटिश कंपन्यांना सहभागी करून घेण्यास आपण उत्सूक असल्याचं पंतप्रधानांनी मे यांना सांगितलं.