पंतप्रधानांचा केनियातून झाकीर नाईकांवर निशाणा
धर्मप्रचारकांनी द्वेष आणि अशांततेचा प्रसार करणे समाजासाठी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नैरोबी : धर्मप्रचारकांनी द्वेष आणि अशांततेचा प्रसार करणे समाजासाठी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केनियातील नैरोबी विद्यापीठात बोलत होते, यावेळी त्यांनी झाकीर नाईक यांच्यावर निशाणा साधला.
पाकिस्तान हा दहशतवादाला आश्रय देत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. जहाल विचारसरणीला थोपविण्यासाठी तरुणाईची भूमिका अंत्यत महत्वाची असल्याचे मोदींनी म्हटले आहे. दरम्यान बुरहान वाणीचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानवर देखील मोदींनी टीका केली आहे.