डेन्मार्क : जगभरात आज शालेय अभ्यासक्रमात लैगिंक शिक्षण दिलं जावं की नाही यावर वाद सुरु आहे. पण डेन्मार्कमध्ये १९७० पासूनच शाळेमध्ये लैगिक शिक्षण दिलं जातं. आलबोर्ग विद्यापीठाचे प्रोफेसर क्रिस्चियन ग्रेगार्डने म्हटलं आहे की, पॉर्न मुलांना कौटुंबिक जीवनात कर्तव्यनिष्ठ आणि इमानदार बनवतं. यामुळे सर्व शाळेंमध्ये लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे आणि पॉर्न फिल्म दाखवल्या पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉर्न आणि वास्तविक जीवनातील लैंगिक संबंध याच्यामधलं अंतर विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतील. त्यामुळे व्यवस्थितपणे प्रशिक्षित शिक्षकांनच्या मदतीने ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसोबत या विषयावर गंभीरपणे चर्चा केली पाहिजे. अनेक सर्वेमधून असं समोर आलं आहे की खूप कमी वयातच मुले आता पॉर्नशी परिचित होतात. म्हणजेच तुम्ही त्यांना शाळेत पहिल्यांदा पॉर्न दाखवणार आहात असं होणार नाही. यावर काही लोकं आक्षेप घेतीलही असं ग्रेगार्ड यांनी म्हटलं आहे.


डेनमार्क हा जगातील पहिला देश आहे जेथे १९६७ पासून पॉर्नवर कोणतीही बंदी नाही.