पॉर्न इंडस्ट्री करणार सामाजिक दृष्टीकोनातून चॅरिटी
फिल्म इंडस्ट्री अनेकदा सामाजिक प्रश्नी मदत करतांना दिसतात.
वॉशिंग्टन : फिल्म इंडस्ट्री जशी हॉलिवूड किंवा बॉलिवूड हे अनेकदा सामाजिक प्रश्नी मदत करतांना दिसतात. पण तुम्हाला हे एकूण नवलंच वाटेल की पॉर्न इंडस्ट्री देखील आता सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे आली आहे.
पॉर्न व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात पैसा कमावत आसतात. त्यामुळे त्यांच्याकडून झालेली मदत ही मोठीच असेल. १३ फेब्रुवारीला जागतिक व्हेल डेच्या निमित्त पॉर्न इंडस्ट्रीने त्यांच्या प्रत्येक २ हजार व्हिडिओमधील कमाईचा १ टक्का व्हेल्स माशांच्या संरक्षणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील अनेक वर्षांपासून व्हेल माशांची संख्या घटली आहे. व्हेल पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या रक्षणासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. आता पॉर्न इंडस्ट्री देखील व्हेल माशांच्या संरक्षणासाठी पुढे आली आहे.
व्हेल इंडस्ट्रीचे म्हणणे आहे की, व्हेल एक सेक्शुअल जीव आहे. ज्यांनी अनेक प्रजातींना प्रसुतीच्या अनेक ऐतिहासिक पद्धती शिकविल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा घेतला आहे. पॉर्न इंडस्ट्रीद्वारा देण्यात येणारी देणगी वॉशिंग्टन येथील बिगर सरकारी संघटनेत जमा केली जाणार आहे.