प्रिन्स-केटला रुम देण्यास हॉटेलचा नकार...
फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय.
नवी दिल्ली : फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय.
अमेन्सच्या 'ले हॉटेल मॅरीट'मध्ये ही घटना घडलीय. त्याचं झालं असं की जेव्हा प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट यांनी या हॉटेलमध्ये रुमसाठी मागणी केली तेव्हा या हॉटेलमधलं रुम बुकींग फुल झालं होतं.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ३० जून ते १ जुलै या दरम्यान दोन रात्रीसाठी रॉयल फॅमिलीला चार सुईटस् हवे होते.
'ले हॉटेल मॅरीट'चे मॅनेजनर ऑलिव्हर वॉल्टी यांच्या म्हणण्यानुसार, फ्रेन्च परदेश मंत्रालयाकडून जानेवारी महिन्यात यासाठी संपर्क करण्यात आला होता. परंतु, सर्व बुकींग अगोदरच फुल झाल्यामुळे आम्हाला ही ऑफर नाकारावी लागली.
रॉयल कुटुंबातल्या प्रिन्स आणि केट यांना इथं रुम देण्यासाठी इतरांचं बुकिंग कॅन्सल करणं योग्य नाही, असं प्रिन्स हॅरी यांनी म्हटलंय.