क्वींसलँड : ऑस्ट्रेलियामध्ये एका कुटुंबाच्या घरात पुन्हा पुन्हा शॉर्ट सर्किट होत होतं. पण जेव्हा स्वीच बोर्ड पूर्ण बाहेर काढला तेव्हा त्याच्या मागे लपून बसलेला अजगर समोर आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॉकेटच्या मागे अंधारात लपून बसलेल्या अजगरमुळे घरात पुन्हा पुन्हा शॉर्ट सर्किटची समस्या येत होती. यामुळे घरात आग लागण्याची परिस्थिती देखील निर्माण झाली असती. पण प्लगमधून धूर आल्यानंतर घरातील लोकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यानंतर तो प्लग काढून पाहिला तर त्यामागे तो अजगर आढळून आला.


अजगर आढळताच सर्प मित्राला बोलवण्यात आलं. त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर अजगराला बाहेर काढलं गेलं. एक तासानंतर हा अजगर सर्प मित्राने बाहेर काढला. रिचीने याचे फोटो सोशल मीडियावर टाकले. कारपेट पायथन नावाचा हा अजगर कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही पोहोचवत. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळतात.