कराची : पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचच्या वडिलांनी म्हटलंय की,  "कंदील बलोच ही माझी मुलगी नव्हती, तर ती माझ्यासाठी मुलगा होता, तिने आमची खूप काळजी घेतली, मदत केली, एवढंच नाही तिचा खून करणाऱ्या भावालाही तिने मदत केली होती, माझा मुलगा, माझा आधार गेल्यासारखं मला वाटतंय", असं कंदील बलोचच्या वडिलांनी रडत-रडत माध्यमांना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंदीलचा लहान भाऊ वसीमने पोलिसांसमोर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं, आपण शनिवारी तिला नशेचं औषध देऊन तिचा गळा दाबला, कारण तिच्यामुळे आमच्या परिवाराची बदनामी होत होती.


वसीमने कंदीलला हाय-प्रोफाईल मॉडलिंग करिअर सोडण्यास सांगितलं होतं. कंदील बलोचच्या अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. कंदील बलोच २६ वर्षांची होती, तिचं खरं नाव फौजिया अजीम होतं, कंदील बलोच आपल्या बेधडक आणि बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियात स्टार झाली होती.