मुलतान : प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिचा मृतदेह घरी आल्यानंतर, कंदील बलोचची आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंदीलची आई एकटीच तिच्या मृतदेहाच्या बाजूला रडत बसली होती, म्हातारे वडीलही मृतदेहाच्या दिशेने पाहत रडत होते.


आपल्या लहान मुलाने घराण्याची समाजात प्रतिष्ठा खराब होत असल्यामुळे तिची हत्या केली, असं ते सांगत होते, मोठ्या मुलाच्या सांगण्यावरूनच लहान मुलाने हे कृतय केल्याचं कंदिलचे वडिल सांगत होते.


कंदील बलोचचे आई-वडिल हे सर्व सामान्य असल्याचं दिसून येतं.


अश्लील व्हिडीओ आणि फोटोंवरून कंदिलवर राग


फेसबुकवर अश्‍लील व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यासाठी कंदिल प्रसिद्ध होती. यावरूनच तिचा भावाबरोबर वाद होत असे आणि त्यातूनच भावाने गोळ्या झाडून तिची हत्या केली. 


पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे. कंदिलने मॉडेलिंग आणि अभिनय सोडावा, असा तगादा तिच्या भावाने लावला होता. एका मुस्लिम धर्मगुरूसोबत सेल्फी काढल्याने कंदिल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 


कंदिलने सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यावर प्रेम असल्याचे जाहीर केले होते. याबरोबरच तिने मार्चमध्ये झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्वकरंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तर स्ट्रीप डान्स करण्याचे जाहीर केले होते.