नवी दिल्ली : कंदील बलोचच्या हत्येपूर्वी तिच्या पहिल्या पतीने तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा कंदीलने आपले लग्न झाले असून आपल्याला एक मुलगा असल्याचे सांगितले होते तेव्हा आशिक हुसैन नावाच्या एका व्यक्तीने आपण कंदीलचा पती असल्याचा दावा केला होता. 


एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, कंदीलने आपले लग्न १७व्या वर्षीच झाल्याचे सांगितले होते. तसेच जबरदस्तीने तिचे लग्न करण्यात आले होते. लग्नानंतर नवरा तिला मारझोड करत असे. त्यामुळे तिच्या मुलासह ती नवऱ्याच्या घरातून पळून आल्याचे कंदीलने सांगितले होते. 


दरम्यान, कंदीलचा पहिला पती आशिक हुसैनने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. उलट कंदील आणि त्याने लव्ह मॅरेज केले होते. तसेच कंदीलने त्याच्यासाठी रक्ताने लिहिलेली पत्रेही आपल्याकडे आहेत असा दावा आशिकने केला होता. तसेच कंदीलला आपल्याकडून कार आणि बंगला हवा होता असेही आशिकने सांगितले होते.