सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक व्यक्ती कमवतो ८० लाख रुपये
गाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं मातीचे घर, शेत, शेतकरी, कच्चे रस्ते. पण एक गाव आहे ज्याने मोठ्या मोठ्या शहरांनाही मागे टाकलं आहे. दरवर्षी येथील गावकरी ८० लाख रुपये कमवतात.
जियांगयिन : गाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं मातीचे घर, शेत, शेतकरी, कच्चे रस्ते. पण एक गाव आहे ज्याने मोठ्या मोठ्या शहरांनाही मागे टाकलं आहे. दरवर्षी येथील गावकरी ८० लाख रुपये कमवतात.
चीनमधील जियांगयिन शहरापासून जवळ हुआझी हे गाव आहे. येथे लोकं आलीशान बंगल्य़ामध्ये राहतात. महागड्या गाड्यांमध्ये फिरतात. गावात सर्व सुविधा आहेत. हे चीनमधील सर्वात श्रीमंत गाव आहे. येथे लोकं शेती देखील करतात. या गावात राहणाऱ्या प्रत्येकाची कमाई वर्षाला ८० लाख रुपये आहे.
१९६१ मध्ये जेव्हा या गावाची स्थापना झाली तेव्हा येथील शेतीची स्थिती खूपच खराब होती. पण गावातील कम्युनिस्ट पार्टी कमेटीचे पूर्व अध्यक्ष राहिलेले वू रेनवाओ यांनी या गावाचं रुप बदललं. सामूहिक शेती प्रणालीचे नियम बनवले गेले आणि तेव्हापासून येथे भरभराटी झाली.