खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं
सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.
सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत. खोदकाम करताना ही हाडं सापडली आहेत. ही हाडं माणसाच्या बोटांची असल्याचा दावा पुरातत्व अधिकाऱ्यांनी केला आहे.
सौदी अरेबियाचं पुरातत्व खातं आणि ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीनं केलेल्या संशोधनावेळी ही हाडं सापडली आहेत. माणसाची ही सगळ्यात जुनी हाडं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.