मुंबई : सऊदी अरबमध्ये महिलांना अनेक बंधनांमध्ये ठेवलं जातं. पण तेथील राजकुमारीने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, जर महिलांनी विचार केला तर कितीही बंधने असली तरी ते यशस्वी होऊ शकतात. सोशल मीडियावर सध्या या राजकुमारीचे फोटो व्हायरल होतायंत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

33 वर्षांची अमीराह अल तावील तिच्या देशातील पहिली महिला आहे जी मोठ्या, लूज कपड्यांऐवजी यूरोपियन कपड्यांमध्ये दिसत आहे. बुर्खा घालून बाहेर पडण्यास तिने नकार दिला. अमीराह त्या सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे ज्यांना खूप बंधनं असतांना देखील पुढे जायचं आहे. अमीराहने सऊदी अरबमध्येच नाही तर संपूर्ण जगात फिरुन सामाजिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अमीराहने आत्तापर्यंत 70 हून अधिक देशांचा दौरा केला आहे.


जगात कोठेही कोणत्याही प्रकारची संकटे आली तर अमीराह तेथे पोहोतून लोकांची मदत करते. अफ्रिेकेमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी अमीराहने घरे बनवून दिली आहेत. पाकिस्तानमध्ये पूर आल्यानंतरही तिने लोकांची मदत केली होती. सोमालियामधील लोकांच्या मदतीसाठी अमीराह नेहमी तेथे उपस्थित असते.


सऊदी अरबमध्ये महिलांवर खूप बंधनं लादलेली असतात. पण अमीराह ही त्या बंधनात अडकून बसली नाही. ती लोकांची मदत देखील करत. अमीराह ही ड्राईव्ह देखील करते आणि इतर महिलांच्या हक्कांसाठी लढते.