मुंबई : रामायणात ज्याला 'पाताळ' असे म्हटले गेले आहे, त्या जागेचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हनुमानाने याच जागेतून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची पाताळपुरीचा राजा चंगूल याच्या तावडीतून सुटका केल्याची कथा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य अमेरिकेतील होंड्युरास देशाच्या नैऋत्य जंगलात ही जागा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या जागेचा काही उपकरणांच्या साहाय्याने ३डी नकाशाही त्यांनी तयार केला आहे. त्यात वानर देवतेची मूर्ती आणि काही हत्यारे असल्याची माहिती संशोधकांना मिळाली आहे.


खरं तर १९४० साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका अमेरिकी संशोधकाला या ठिकाणी काही अवशेष सापडले होते. त्यावेळी काही अमेरिकी वृत्तपत्रांत तेथे प्राचीन काळी वानर देवतेची पूजा केली जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्या संशोधकाने या जागी संशोधन केले त्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला.


आता ७० वर्षांनंतर अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एअरबॉर्न लेझर मॅपिंगच्या काही संशोधकांनी एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होंड्युरासच्या जंगलात थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करुन या शहराचा शोध लावला आहे.


इथे लेझर तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या नकाशांमध्ये मानवानिर्मित अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यात गदेसारखे हत्यार घेतलेली गुडघ्यांवर बसलेली मूर्तीही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. होंड्युरासच्या जंगलात उत्खनन करण्यास मनाई असल्याने आता याविषयी जास्त संशोधन करता येणार नाही, असे म्हटलेय.


रामायणात वर्णन केल्याप्रमाणे 'पाताळा'चे अंतर १००० योजना म्हणजेच १२,८०० किलोमीटर दूर आहे. विशेष म्हणजे भारतापासून हे ठिकाण एका बोगद्याच्या माध्यमातून हे अंतर तेवढेच आहे. यामुळे रामायण खरंच घडले का, याविषयी आता सर्वांच्या भूवया आता उंचावल्या आहेत.