वेलिंग्टन : परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अकल्पित घटनेनं आता जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भुकंपाच्या घटनेनंतर न्यूझीलंडमध्ये समुद्राला चिरत चक्क सात फुट उंच जमीन प्रकट झाली आहे. समुद्रतळाखालचं जग चक्क सूर्यप्रकाश पाहत आहे. शंख शिपल्यांच्या वस्तीना आता आभाळाच छत मिळालं आहे. शेवाळ आणि जलपर्णीची ही जमीन तुम्ही वास्तवात फारच क्वचितच पाहिली असेल.


या भुकंपाने केवळ समुद्र गिळला अस नाही तर काही ठिकाणची जमीनही गायब झाली आहे. काईकूरा द्वीपजवळ भूकंपानंतर तीन गायी चरत असताना चक्क आजूबाजूची जमीन गायब झाली आणि वाट हरवलेली बिच्चारी गाय आणखीनच गरीब झाली.



न्यूझीलंडमधील 7.8 रिश्तर स्केलच्या भुकंपानंतर सगळीकडेच घबराट पसरली आहे.  वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा भुकंप चारशे अणुबॉम्बच्या स्फोटाच्या क्षमतेएवढ्या हाद-यांचा होता. रस्त्यावर लोकांना उभ राहणं कठीण होतं आणि  इमारती कोसळत होत्या. रस्ते तुटल्याने वाहनांची शब्दशहा खेळणी झाली होती. रेल्वे रुळाची अवस्था तर फारच भयानक झाली आहे. न्यूझीलंडला भुकंप काही नवे नाहीत पण हा तडाखा न्यूझीलंड विसरु शकत नाही.