मुंबई : भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.


हे आहे कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत चीननं ज्या देशाला हत्यारविक्री केलेली आहे तो देश दुसरा तिसरा कोणताही नसून पाकिस्तान आहे... पाकिस्तानकडे जवळपास 77 टक्के हत्यारं चीन बनावटीचे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, आत्ताआत्तापर्यंत पाकिस्तानजवळ असणारे 55 टक्के हत्यारं अमेरिकन बनावटीचे असायचे.


2005 सालापासून पाकिस्तानात चीनी बनावटीचे किती हत्यारं आयात करण्यात आलेली आहेत त्याचे काही आकडे उपलब्ध झालेत. या आकड्यांची सिपरी आर्म्स ट्रान्सफर्स डाटाबेसमध्ये नोंद आहे.


- 2005 सालापर्यंत पाकिस्तान अमेरिकेकडून 34.9 टक्के हत्यारं आयात करत होतं तर 46.6 टक्के हत्यारं हे इतर देशांतून येत होते. यावेळी चीनकडून केवळ 18.5 टक्के हत्यारांची आयात केली जात होती.


- परंतु, 2015 सालापर्यंत पाकनं 76.9 टक्के हत्यारं एकट्या चीनकडून आयात केले. यावेळी अमेरिकेकडून आयात करण्यात आलेल्या हत्यारांची संख्या 9 टक्क्यांवर येऊन पोहचली होती.


पाकिस्तानकडे ही आहेत चीनी बनावटीची हत्यारं...


- टाइप 56 असॉल्‍ट राइफल


- टाइप 81 असॉल्‍ट राइफल


- जेएफ-17 थंडर जेट


- अर्ली वॉर्निंग एंड कंट्रोल सिस्‍टम (अवॉक्‍स)


- डब्‍लूयजेड-10 अटैक हेलीकॉप्‍टर


- एमबीटी-2000 अल खालिद बैटल टैंक


- एचजे-8 एंटी टैंक मिसाइल